लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परिसरात १५ आणि १६ जुलै रोजी दमदार पाऊस कोसळला. याशिवाय १७ जुलै रोजी देखील अधूनमधून चांगला पाऊस झाल्याने खरिपातील संकटात सापडलेल्या पिकांना संजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकवेळ पल्लवित झाल्या आहेत.यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या दमदार पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी खरिपातील पेरण्या आटोेपत्या घेतल्या होत्या. मात्र, मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे अंकुरण्याच्या अवस्थेतील; तर कुठे वाढीस लागलेली पिके धोक्यात सापडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असतानाच १५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. १६ जुलै रोजी दिवसभर पावसाने हजेरी लावली; तर १७ जुलै रोजी देखील समाधानकारक पाऊस कोसळला. ढगाळी वातावरण कायम असल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारच्या पावसाची सरासरी २२ मिमी. नोंदजिल्ह्यात शनिवारी सरासरी २३.४० मिलीमिटर पाऊस कोसळला; तर रविवारी दिवसभर झालेल्या पावसाची २२.०७ मिलीमिटर एवढी नोंद घेण्यात आली. यात सर्वाधिक पाऊस वाशिम तालुक्यात (४१.४० मिलीमिटर) कोसळला असून पावसाअभावी संकटात सापडलेली खरिपातील सर्वच पिके तरारल्याचे दिसून येत आहे.
वाशिम परिसरात पावसामुळे पिकांना संजीवनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:52 AM