जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी पेरणीही केली; परंतु मृग नक्षत्राच्या पावसाचे आगमनच झाले नसल्याने शेतकरीवर्गात निराशेचे वातावरण पसरले होते. त्यानंतरही जिल्ह्यात दोन आठवडे दमदार पाऊस पडला; परंतु जूनच्या अखेरपासून पावसाने खंड दिला. त्यामुळे पिके सुकू लागली आणि नदी, नालेही कोरडे झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अशात शनिवारी रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी रात्री आणि सोमवारीही चांगला पाऊस पडला. यामुळे परिसरातील लहान नद्या, नाल्या वाहू लागल्या. बहुतांश नाले काठोकाठ भरून वाहत असल्याचेही दिसून आले. दरम्यान, या पावसानंतर शेतकरी सुखावला असून, पिकांना मोठा आधार मिळाला आहे.
पावसामुळे नदी, नाले काठोकाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:46 AM