निवेदनाचा आशय असा की. राज्यात कोविड-१९ची स्थिती सध्याच नियंत्रणात आली असून, दुसऱ्या लाटेत राज्यात रुग्णांचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त होते. नुकतेच आरोग्य विभागाशी निगडित सर्व घटकांमुळे दुसरी लाट आता ओसरली व न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात पुढील महिन्यात पाच जिल्हा परिषद व ३३ पंचायत समितींमधील रिक्त पदाच्या पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातसुद्धा पोटनिवडणूक होईल, तशा प्रकारचा आदेशसुद्धा आला आहे; परंतु विविध तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय संस्था यांच्या संशोधनानुसार राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव अतिशय भयंकर होण्याची शक्यता आहे. यातच आपण निवडणुकीसाठी जरी आदेश व नियम लागू केले तरीही स्थानिक पातळीवर निवडणुकीदरम्यान फिजिकल डिस्टन्सिंग व इतर नियमांचे पालन होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता आपण या निवडणूक रद्द करून पुढे ढकलाव्यात, अशी मागणी रुग्णसेवा युवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
कोविड संसर्गाच्या धोक्यामुळे जि.प., पं.स. निवडणूक पुढे ढकलावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:28 AM