लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानक परीसरातील विद्युत पुरवठा बंद असल्याने प्रवासी वर्गांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकारामुळे बसस्थानक परीसरात चो-यांचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नियमित विद्युत पुरवठा बंद राहतो. या गंभीर समस्याकडे आगार व्यवस्थापक यांनी लक्ष दयावे अशी मागणी शहरातील राजीव भेंटे यांनी १२ डिसेंबर रोजी आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.कारंजा बसस्टॅन्ड परीसरातील विद्युत पुरवठा १२ डिसेंबर रोजी बंद असल्याने अवैध प्रवासी वाहतुक थेट बसस्टॅन्ड परीसरात शिरुन बसस्थानकामधील प्रवाशी भरून घेउन जात असल्याचे दिसून आले.
विद्युत पुरवठा बंद असल्याने कारंजा आगार अंधारात गडप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:56 PM
कारंजा लाड : स्थानिक बस आगार व परिसरातील दिवे बंद असल्याने कारंजा आगारासह परिसर अंधारात गडप झाला आहे. याकडे मात्र आगार व्यवस्थापकांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे.
ठळक मुद्देदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधारआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष