लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २0१६-१७ या वर्षात पाणीटंचाई निवारणार्थ करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांसाठी अमरावती विभागाला ४३.४५ कोटीचा निधी मंजूर झाला. अमरावती विभागात पाणीटंचाई निवारणार्थ नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजना व विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. परंतु निधीअभावी अनेक देयके थकित होती. ३0 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निधी वितरणास मान्यता दिली. विभागीय आयुक्त स्तरावरून लवकरच त्या-त्या जिल्ह्याला निधीचे वितरण केले जाणार आहे.
अमरावती विभागाला ४३.४५ कोटींचा निधीविभागातील पाच जिल्ह्यांसाठी ४३ कोटी ५३ लाख ७६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. नवीन विंधन विहिरींसाठी दोन कोटी १६ लाख १६ हजार रुपये, नळ योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी १८ कोटी ६४ लाख ५0 हजार रुपये, तात्पुरत्या पूरळ नळ योजनेसाठी २ कोटी ७३ लाख नऊ हजार, टँकरने पाणी पुरवठय़ासाठी ३ कोटी ७३ लाख १२ हजार रुपये, विहिरींचे अधिग्रहण यासाठी ४ कोटी १४ लाख ६३ हजार रुपये आणि नागरी भागांसाठी दोन कोटी ७0 लाख २३ हजार रुपयांचा समावेश आहे.