वाशिम : एखादी कलाकृती बघून अनायास तोंडातून वाह शब्दाचा उच्चार होतो आणि अशी कलाकृती टाकाऊ वस्तुपासून नाममात्र खर्चात तयार झालेली असेल तर कलाकृती सोबतच कलाकृती बनविणार्या कलाकारांचे कौतुक करावसे वाटते. लोकमत सखी मंच हीच कल्पना घेवून आपल्या साठी घेऊन येत आहे. टाकाऊ पासून टिकाऊ कार्यशाळा ज्यात झीटीव्ही मराठी फेम नीता बोबडे नैसर्गिकरित्या निरुपयोगी असलेल्या वस्तुपासून उपयोगी वस्तु कमीत कमी खर्चात कशी बनविता येते ते शिकविणार आहेत.ही कार्यशाळा सोमवार २३ जून रोजी मालतीताई सरनाईक विद्यालय बसस्टॅन्ड जवळ वाशिम येथे दुपारी १२ वाजता घेण्यात येत आहे. नोंदणी शुल्क सखी मंच करिता २0 रुपये व इतराकरिता ५0 रुपये असून प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कार्यक्रमस्थळी सभासद आयकार्ड आणावे. या कार्यक्रमामध्ये इको फ्रेन्डली ज्वेलरी अंतर्गत गवताचे मोती, शंखाची ज्वेलरी, गुंजेची ज्वेलरी व इतर प्रकार इको फ्रेन्डली प्लॉवर मेकींग, इको फ्रेन्डली फ्लॉवर पॉट, फुड क्राफ्ट व नविन फॅशनेबल स्टॉल सोबतच इतर अनेक वस्तु बनविणे शिकायला मिळणार आहे.कार्यशाळा वेळेवर सुरु होणार येतांना वही व पेन सोबत आणावे, तरी जास्तीत जास्त महिलांनी या संधीचा उपयोग घ्यावा.अधिक माहितीसाठी सखी मंच संयोजीका मीनाक्षी फिरके यांच्शी ९८५0३८२१४0 या क्रमांकावर व नाव नोंदणीकरिता संपर्क लोकमत कार्यालय वाशिम अर्बन बँके जवळ वाशिम ९९२२९२८१८४, वर संपर्क करावा.
टाकाऊपासून टिकाऊ इको फ्रेन्डली कार्यशाळा
By admin | Published: June 17, 2014 9:32 PM