दुष्काळमुक्तीचा ध्यास: कारंजा तालुक्यातील ७ गावाचे प्रयत्न वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कारंजा तालुुक्यातील ७ गावचे ग्रामस्थ रात्रीच्यावेळीच लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करीत आहेत. कामांत उन्हामुळे अडथळा येऊ नये यासाठी हे ग्रामस्थ बहुतेक काम रात्रीच्यावेळीच बहुतांशी कामे करीत असल्याचे दिसत आहे. वॉटरकप स्पर्धेला प्रत्यक्षात ७ एप्रिलपासून सुरूवात होणार असताना कारंजा तालुक्यामधील गावांनी ६ एप्रिल रोजी आपला अर्ज सादर करून प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ७ एप्रिलपासून या स्पर्धेला सुरुवात झाली असली तरी, त्यांनी ६ एप्रिलच्या मध्यरात्री जलसंधारणाची कामे सुरू केली आहेत. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार पटकावण्याचा नव्हे, तर या माध्यमातून गावातील दुष्काळाची समस्या कायमची मिटविण्याचा ध्यास या ७ गावच्या ग्रामस्थांना लागला आहे. असा उपक्र म राबविणाऱ्या गावांतील भुलोडा येथे एका रात्रीतून वृक्ष लागवडीसाठी २५० खड्डे खोदले, जयपूर येथील महिला पुरुषांनी रात्रभर घाम गाळून सीसीटीचे काम केले. शिवण बु. येथे वृक्ष लागवडीसाठी ३०० खड्डे खोदण्यात आले. जानोरी येथे माती नाल्याचे काम करण्यात आले. हिंगणवाडी येथे नदीवर वनराई बंधाऱ्याच्या कामासाठी वृक्ष लागवडीचे खड्डे खोदण्यात आले. आखतवाडा येथे ग्रामस्थांनी ५०० वृक्ष लागवडीचे खड्डे खोदले, तर काकडशिवणी येथील ग्रामस्थांनी शेततळ्यातील गाळ उपशाचे काम केले. या गावांच्या कामाने प्रेरित होऊन आता इतरही गावे जलसंधारणाची झपाटल्यागत करीत आहेत.
रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी केली जलसंधारणाची कामे
By admin | Published: April 09, 2017 2:42 PM