- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहराला लागूनच असलेल्या शेलूबाजार मार्गावरील कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन लवकरच अतिक्रमणातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वे नंबर ४४६, ४४७ मधील अतिक्रमण हटविण्यासाठी उपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत दिली आहे.वाशिम शहरात तसेच शहर परिसरात महसूल विभागाच्या मालकीच्या अनेक जमिनी, भूखंड आहेत. काही प्रकरणं न्यायप्रविष्ठ आहेत तर काही भूखंड, जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. शहराला लागून असलेल्या रेल्वे लाईन, शेलुबाजार मार्गालगतच्या सर्वे नंबर ४४६, ४४७ या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमण केल्याची बाब महसूल विभागाच्या पाहणीतून समोर आली आहे. काही जणांनी तर पक्के बांधकाम करून तेथे ठाण मांडले आहे. सर्वे नंबर ४४६ आणि ४४७ मधील इ-क्लास जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात वाशिम तहसिल कार्यालयाने जिल्हाधिकाºयांकडे पत्रव्यवहारही केला होता. याची दखल घेत जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी अतिक्रमण हटविण्यासाठी ‘अतिक्रमण निष्कासित पथक’ गठीत करण्याचे निर्देश २८ मे रोजी दिले आहेत. या पथकाचे अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी तर उपाध्यक्ष म्हणून वाशिम तहसिलदार आणि सदस्य सचिव म्हणून वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांचा समावेश आहे. या पथकाने अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या आहेत. अतिक्रमणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरवावा, अशा सूचनाही पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांना दिल्या आहेत. पथक गठीत झाल्याने कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन अतिक्रमणमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तीन दिवसांची मुदतसर्वे नंबर ४४६, ४४७ मधील इ-क्लास जमिनीवर अनेकांनी पक्के बांधकाम केले आहे. काही जण येथे वास्तव्य करतात तर काही जणांनी भूखंड ताब्यात ठेवले आहेत. या जमिनी व भूखंडावरील अतिक्रमण करणाºया संबंधित नागरिकांना महसूल विभागाने नोटीस बजावून तीन दिवसात स्वत:हून अतिक्रमण हटवावे, असे निर्देश दिले आहेत. तीन दिवसात अतिक्रमण हटविले नाही तर महसूल, नगर परिषद व पोलीस प्रशासनातर्फे अतिक्रमण काढण्यात येईल, अतिक्रमण काढण्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल किंवा संबंधित नागरिकांच्या घरातील साहित्य जप्त केले जाईल, असा इशाराही देण्यात आला.निवासी, वाणिज्यिक प्रयोजनवाशिम शहरालगतच्या सर्वे नंबर ४४६, ४४७ मधील इ-क्लास जमिन ही निवासी तसेच वाणिज्यिक प्रयोजनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ‘म्हाडा’च्या गृहनिर्माण प्र्रकल्पासाठी सदर जमिन उपयुक्त ठरू शकते तसेच वाणिज्यिक वापरासाठीदेखील भविष्यात ही जमिन महत्त्वाची ठरणार असल्याने या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
इ-क्लास जमिन घेईल मोकळा श्वास; अतिक्रमण हटविण्यासाठी पथक गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 4:35 PM
वाशिम : वाशिम शहराला लागूनच असलेल्या शेलूबाजार मार्गावरील कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन लवकरच अतिक्रमणातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठळक मुद्देउपविभागीय अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना तीन दिवसांची मुदत दिली आहे.कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन अतिक्रमणमुक्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.