यावेळी वाशिम तालुका दंडाधिकारी विजय साळवे, मंडळाधिकारी जोशी, अनसिंगचे तलाठी विष्णू दवणे, सरपंच संतोष खंदारे,उपसरपंच आय्युप खॉ पठाण, ग्रा.पं. सदस्य कुंडलिक ढगे, चिंतामण लांडगे, जगदीश राजे, संतोष ठाकरे, गजानन कड, रामेश्वर गोरे व शेतकरी गजानन कुंटे, राजकुमार मानधने, राजुसिंग बैयस ठाकूर, राजेश पवार, संदीप सातव, संतोष गोरे, इंदजित पवार, बाबुसिंग पवार, वैभव बाविस्कर, गोपाल पवार, शरद मांडवगडे, भगवान नवघरे, गोपाल भालेराव, प्रवीण खंदारे, विवेक गायकवाड, सुनील शिंदे, विठ्ठल राऊत, शुभम राऊत, अरिफ खान आसीफ खान, सुनील धुळधुळे, संजय मनवर, लक्ष्मण पाबळे, माधव चव्हाण, रामेश्वर इंगळे, लियाखत खाँ मोहम्मद खाँ, लक्ष्मण लोंढे, ईश्वर शिंदे व शेतकरी उपस्थित हाेते.
----
उमरा शमशाेद्दीन येथे मार्गदर्शन
अनसिंग : शेतकऱ्यांच्या सातबारावरील पेरेपत्रक अपडेट करणयाची जबाबदारी आता शासनाने शेतकऱ्यांवर ठेवली आहे, त्या अनुषंगाने शासनाने ई पीक पाहणी ॲपची निर्मिती केली. त्या ॲपवर आपल्या शेतातील पीकपेरे मोबाइलवरून कसे नोंदवावे यासाठीचे प्रशिक्षण उमरा (शम) तलाठी गणेश जाधव यांनी तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल चौतमाल, देवराव चौतमाल, गजानन जाधव , वैजनाथ इंगळेश, माधव इंगळे, संजय जऊळकर, बबलू जावळे, दिलीप कव्हर, हरीभाऊ चौतमाल, रामजी कव्हर, किसन इंगळे यांना प्रशिक्षण दिले.
----
माती परीक्षणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
अनसिंग : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित गीताई ह्युमनकाईंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणेद्वारा संचालित कृषी महाविद्यालय आमखेडा येथील सातवे सत्राच्या विद्यार्थ्यांनी कृषी जागृकता व कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत कृषिदूत आकाश शालिग्राम घायाळ यांनी अनसिंग येथे शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्याची पद्धत व त्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भागवत दुधाट ,ऋषिकेश कदम, प्रवीण जाधव, गणेश धोंडे, प्राचार्य डॉ. जी .एस. वासू , प्रा.एस. टी. कव्हर आदि प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.