मार्च २०२० पासून राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला. याचा परिणाम सर्वच स्तरावर होत असून, कोरोना संसर्गाच्या महामारीत महागाईचा मार जनतेला सोसावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमती आयात करावर दोन्ही देशांनी लावलेले आयात-निर्यात शुल्क, परदेशांत कमी झालेले उत्पन्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचे संकट या विविध कारणांमुळे खाद्यतेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात या किमतीत २० टक्क्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेलाचे दर सरासरी २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांचे दर वाढले असून, ग्राहकांकडून सोयाबीन तेलास सर्वाधिक मागणी होत आहे. खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. येत्या काही दिवसांत तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
^^^^^^^^^
कोट: कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी तेलाची आवश्यकता असते. तेलाच्या किमती वाढल्याने बजेट कोलमडले असून, दररोजच्या तेल वापरात कपात केली आहे.
-संगीता मोरे, गृहिणी
---------
कोट: गत दोन महिन्यांपासून तेलाचे दर सतत वाढत आहेत. तेलवर्गीय खाद्य पदार्थाचा वापर त्यामुळे कमी करावा लागला असून, भाज्यातही कमी तेल वापरत आहोत.
-सविता गायकवाड, गृहिणी
-----------
कोट: तेलाच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत की, भाज्यात तेल वापरावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. चपात्यांना तेल लावणेही बंद केले आहे. तेलाच्या वाढत्या दराने स्वयंपाक घराचे बजेटच कोलमडले आहे.
-अनिता महल्ले, गृहिणी
-------------
कोट: कोरोना संसर्गाचे वाढत चाललेले संकट, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढलेल्या किमती तेल वाहतूक व्यवस्थेत येत असलेला अडथळा आदि कारणांमुळे खाद्यतेलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
-खन्नूभाई खेतीवाले,
तेल व्यापारी
-------
मार्च महिन्यात उच्चांकी वाढ
खाद्यतेलाच्या किमतीत मार्च महिन्यात उच्चांकी वाढ झाली आहे.
-------
विदेशी बाजाराचा परिणाम
मागील वर्षभरापासून जनतेला कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत वाढ झाली. तेलाचा कृत्रिम साठा वाढला. या कारणामुळे तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
----------
खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो)
तेल - मार्च २०२० - मार्च २०२१
करडी १९५ - २२५
सूर्यफुल १३० - १६५
शेंगदाणा १५० - १८०
सोयाबीन १०० - १४५
सरकी तेल ९० - १३८
--------