लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ईदनिमित्त शहरातील मुख्य मार्गावरुन मुस्लीम बांधवांनी भव्य मिरवणुक काढून ईद उत्साहात साजरी केली. यावेळी मिरवणुकीत असलेल्या डिजेवर तरुणाई थिरकताना आढळून आली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वाशिम शहरातील मुख्य मार्गावरुन ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जागोजागी मिरवणुकीतील नागरिकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था अनेकांनी केली होती.मुस्लिम समाज बांधवांचयवतिने मिरवणुक मार्गावर लावण्यात आलेले हिरवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाजी चौकापासून ते पाटणी चौकापर्यंत मिरवणुकीत सहभागी नागरिकांना पाण्याची , चहाची व नाश्याची व्यवथा सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेकांनी केली होती. मिरवणुकीचा त्रास कोणालाही होवू नये याकरिता रस्त्याच्या एका बाजुने शिस्तबध्द पध्दतीने मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी ईद उतसाहात साजरी केली. यावेळी पोलीस विभागाच्यावतिनेही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक वेगवेगळया वेशभुषेमध्ये मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हातात हिरवे झेडे व डिजेच्या तालावर तरुणाई मोठया प्रमाणात थिरकतांना दिसून आली. युवकांमध्ये या मिरवणुकीमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शिरपूरात ईद मिलादुन्नबीनिमित्य मिरवणूक उत्साहात शिरपुर जैन.. येथे मुस्लिम बांधवांच्यावतीने ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली. यानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिरपूर येथे दरवर्षी मुस्लिम धर्मियांच्या वतीने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. यावषीर्ही ईद मिलादुन्नबीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १९ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले.२० नोव्हेंबरला धार्मिक कार्यक्रम पार पडले.२१ नोव्हेंबर रोजी चिंचेच्या झाडापासून ईद मिलादुन्नबी निमित्त ढोल ताशे बेंजोच्या निनादात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मुस्लिम युवक ढोल ताशाच्या तालावर थिरकताना दिसले. मिरवणुकीतील सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांसाठी नगीना मशीद, गुजरी चौक, बागवान पुरा, पोलिस स्टेशन जवळ शरबत, चहापाणी, तथा अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी ही पोलिस स्टेशन जवळ पत्रकार तथा गावातील मान्यवर मंडळींचा सन्मान केला.