शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये ईद मिलन सोहळा

By admin | Published: July 17, 2017 2:33 AM

शिरखुर्म्याचे वितरण: ५२ गावांच्या पोलीस पाटलांसह प्रतिष्ठितांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : येथील पोलीस स्टेशनच्या आवारात रविवार १६ जुलै रोजी ईदमिलन उत्साहात पार पडला. कार्यक्रमात सर्व समाजबांधवांना पोलिसांच्यावतीने शिरखुर्मा वितरित करण्यात आला.आसेगांव पोलीस स्टेशनच्या आवारात रविवार १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ईदमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणेदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सरपंच अकबर पटेल, उपसरपंच सत्तार शाह, मनवर खान, जाहिद खान पटेल, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष इरफान शेख, विष्णू चव्हाण, माजी मुख्याध्यापक ताहिर अली खान, शाकिर शेख, दाऊद खान, संदीप ठाकरे, विष्णू फड, पुंडलिक पाटील, मुदस्सिर खान, हाजी गफ्फार कुरैशी, विस्तार अधिकारी हाजी अब्दुल गनी, विशाल धानोरकर, दिनेश चव्हाण. फिरोज पटेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ.अशफाक शेख, डॉ.उकंडा राठोड, रहेमान पटेल, नूर खान पटेल, नारायण जाधव आणि सुभाष कावरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राठोड यांनी केले. यावेळी बोलताना ठाणेदार विनायक जाधव म्हणाले, की कोणत्याही सणउत्सवात भेदभाव दूर सारून आयोजित केले जाणारे मेळाव्याचे कार्यक्रम सामाजिक एकता व अखंडतेचे प्रतिक ठरतात. यापुढेही रमजान ईदप्रमाणेच आगामी गणेशोत्सव, बकरी-ईद आणि दुर्गोत्सवासारख्या धार्मिक उत्सवातही परंपरा कायम राहण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमात आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गिराटा, गोस्ता, जगदंबा, खर्डा, चिखलागड, गिर्डा, रणजीतनगर, उज्वल नगर, वार्डा, साळंबी, सावरगांव, भिलडोंगर, खापरदरी, हळदा, विळेगांव, खांबाळा, रुई, पाळोदी, ढोनी, शेंदुरजना, चिंचोली, दाभडी, रामगड, मथुरा, भडकुंभा, वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, हिवरा, सनगांव, शेगी, चिचखेडा, रामगांव, मोतसावंगा, ईचोरी, फालेगांव, सार्सी, मसोला, दस्तापूर, बिटोडा, कळंबा, कासोळा, धानोरा, नांदगाव, शिवणी, लही, वसंतवाड़ी, वारा जहांगीर , देपूळू, कुंभी, आसेगांव आणि पिंपळगाव या ५२ गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्राम सचिव, तसेच प्रतिष्ठीत नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.