०००००
रस्ता दुरूस्तीची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील रिधोरा-पांगराबंदी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले असून, रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली. मालेगाव तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली.
०००००
शिक्षकांच्या बदली प्रक्रियेकडे लक्ष
वाशिम : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण निश्चित झाले असून, त्यानुसार प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केव्हा होतात, परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना मिळणार का? याकडे लक्ष लागून आहे.
००००
किन्हीराजा परिसरात स्वच्छतेचा बोजवारा
वाशिम : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत २०१९ मध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई केली होती. यंदा कोरोनाकाळातही कारवाईची मोहीम सुरू आहे. मात्र, नागरिक मोठ्या संख्येने उघड्यावर शौचास जात असल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडत असल्याचे किन्हीराजा परिसरात दिसून येते.
0000
मीटर रिडिंग न घेताच वीजग्राहकांना देयके
वाशिम : वाशिम शहरात अनेक ग्राहकांना महावितरणकडून ‘फॉल्टी मीटर’च्या नावाखाली मीटर रिडिंग न घेताच वारेमाप देयके आकारण्यात येत असल्याने ग्राहकांना भुर्दंड बसत आहे. याकडे संबंधित अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांनी केली.
000
रस्त्यावर खड्डे; वाहनचालक त्रस्त
वाशिम : मेडशी-वाशिम या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. खड्डे बुजविण्याची मागणी यापूवीर्ही करण्यात आली होती. परंतु, अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.