मंगरूळपीर तालुक्यात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या केंद्रबिंदू असलेल्या शेलुबाजार येथील ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोणता गट सत्ता खेचून आणतो याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत एकता ग्रामविकास पॅनलने १३ पैकी ७ सदस्य निवडून आणत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
प्रभाग क्र. १मध्ये सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या मतमोजणीत रवी अनंतराव लांभाडे १२९ तर रजनीश सुरेशचंद्र कर्णावट यांना ४०८ मते मिळाली, महावीर लालचंद तोडरवाल ३१९, उमेश बोबडे ७, शेख हनीफ ३२, ना.मा.प्र. जागा ज्योती विठ्ठल लांभाडे ५१७, इंदू किसन पानभरे ३६९ सर्वसाधारण महिला प्रमिला सीताराम पवार ४५१, सोनू अनिल काटकर ३६७, स्नेहल भूषण शेळके ७१ तर प्रभाग क्र. २मध्ये श्यामसुंदर अग्रवाल १३६, शाहरूख खान मनवर खान १६१, कलावती रमेश चक्रनारायण ५८, शाह असलम शाह रुस्तम १२१, ना.मा.प्र. महिला संपदा संतोष राऊत १५२, रेणुकाबाई विनोद वैद्य २४३, शाह तमिजा बी हुसैन ७१. प्रभाग क्र. ३ सर्वसाधारण महिला शुभांगी मंगेश अरबाड २६८, श्रद्धा रवी राऊत २१४ सर्वसाधारण, हितेश मधुकर वाढेकर २७६, सुनील शालीग्राम हरणे १८१, चंद्रकांत भिकाजी ठाकरे २५. प्रभाग क्र. ४ अनुसूचित जाती अनिल शालिग्राम गवई ३१९, सदानंद श्रीराम चक्रनारायण २४९, सर्वसाधारण महिला खान शाहिस्ताबी वलाय्यत खान ३०६, मोहम्मद हमीदाबी फारुख मोहम्मद २९३, ना.मा.प्र. प्रकाश नंदकिशोर अपूर्वा २२३, सुशील रमेशचंद्र अपूर्वा १०५, किशोर रामप्पा गाडगे २८३. प्रभाग क्र. ५ ना.मा.प्र. जय कृष्णप्रसाद गुप्ता ३६७, संतोष विश्राम लांभाडे २७२, अनुसूचित जाती महिला आशा अशोक खंडारे ३८३, मीरा विजय परसे २२२, सर्वसाधारण महिला मंदा भागवत लांभाडे २६४, शाह मालनबी कासमशाह २२०, कविता प्रवीण राठी १५१ अशी मते प्राप्त झाली आहे.