मंगरूळपीर तालुक्यातील १३ ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचपदांच्या निवडणुकीत भूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनीता रमेश चौगुले, तर उपसरपंचपदी राजेंद्र राऊत, चिंचखेडा सरपंचपदी सिंधू संतोष चौधरी, उपसरपंचपदी सिंधू मोहन चौधरी, सायखेडा सरपंचपदी मनीष गहुले, उपसरपंचपदी आशा डिगांबर काळे, हिसई येथे सरपंचपदी शोभाबाई पांडुरंग जाधव, तर उपसरपंचपदी नंदकिशोर साखरे, ईचा येथे सरपंचपदी सुवर्णा मोहन वानखडे, तर उपसरपंचपदी सिद्धार्थ सावध, चांधई येथे सरपंचपदी चंद्रकला राजेश जाधव, तर उपसरपंचपदी रवींद्र ठाकरे, कवठळ येथे चंद्रशेखर भगत यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी सविता शिवानंद गोरटे यांची, निंबी सरपंचपदी कुसुम अंबादास टोपले, तर उपसरपंचपदी केशव आडे, कोठारी येथे सरपंच मनीषा मंगेश नीळकंठ, तर उपसरपंच रामचंद्र धोंगडे, पार्डी ताड सरपंचपदी रुख्मिना बाळू लांभाडे, तर उपसरपंच भारत भगत, तऱ्हाळा सरपंच प्रियांका विवेक महल्ले, तर उपसरपंचपदी शीला दिलीप भगत, वनोजा येथे श्रीराम मुखमाले, उपसरपंचपदी गीता रमेश राठोड, पेडगाव येथे सरपंचपदी माया अमोल धोंगडे, तर उपसरपंचपदी विनोद पवार यांची निवड करण्यात आली.
मंगरूळपीर तालुक्यातील १३ सरपंच, उपसरपंचांची निवड शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:42 AM