जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी पार पडली. त्यात १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन नवीन सदस्य निवडून सुद्धा आले आहे. तेव्हापासून सरपंच पदाची निवडणूक कधी होणार याबाबत जिल्हावासियांना उत्सुकता लागली होती. आता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड १५, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सतरा सदस्य शिरपूर ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिरपूर सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती साठी निघाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी १२ सदस्य शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक अंभोरे यांच्या क्रांती पॅनल, तिसरी आघाडी व जय हो पॅनल या समूहाचे निवडून आले आहे. तर एकता पॅनलचे केवळ पाच सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंच निवडीमध्ये क्रांती पॅनल, तिसरी आघाडी, जय हो गटाच्या राजकन्या संतोष अडागळे यांची सरपंच पदी वर्णी लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
शिरपूर येथील सरपंच पदाची निवड १६ फेब्रुवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:18 AM