शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

तीन टप्प्यांत होणार सरपंचपदासाठी निवडणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:35 AM

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ ...

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ ऑगस्ट ते डिसेंबर २०२० यादरम्यान संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान व १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये रिसोड तालुक्यातील ३४, मालेगाव ३०, कारंजा २८, मंगरूळपीर २५, वाशिम २४ आणि मानोरा तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला, तर काहींनी आपली पत राखली. २ फेब्रुवारी रोजी तालुकास्तरावर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढल्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. आता सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक होणार असल्याने मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आल्याचे दिसून येते. काही ठिकाणी सरपंचपदासाठी तीन, तीन प्रबळ दावेदार असल्याने पॅनलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून सदस्यांना सहलीवरही पाठविले जात आहे, तर काही ठिकाणी सदस्यांवर गावातच लक्ष ठेवले जात असल्याचे दिसून येते. सरपंचपद मिळाले नाही, तर इच्छुक उमेदवार हे विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा धोका नाकारता येत नसल्याने सदस्य सांभाळून ठेवताना पॅनलप्रमुखांची चांगलीच कसरत होणार आहे. १५ व १६ फेब्रुवारी रोजी सहाही तालुक्यात, तर १७ फेब्रुवारी रोजी मानोरा व मालेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. सरपंचपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला वेटिंगवर राहावे लागणार, याकडे राजकीय क्षेत्रासह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.

०००

बॉक्स

सावध पवित्रा, सदस्य सहलीवर

सरपंचपदाची निवडणूक जवळ येत असल्याने ऐनवेळी कोणताही धोका नको म्हणून अनेक पॅनलप्रमुखांनी सदस्यांना सहलीवर पाठविल्याची चर्चा रंगत आहे. प्रतिस्पर्धी गटाकडून सदस्यांची पळवापळवी होऊ नये म्हणून पॅनलप्रमुखांनी सावध पवित्रा घेतल्याचे दिसून येते.

००००

कोट बॉक्स

जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी १५ ते १७ फेब्रुवारी, अशा तीन टप्प्यांत निवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.

-सुनील विंचनकर,

उपजिल्हाधिकारी (महसूल) वाशिम

००००

बॉक्स

...अशा आहेत ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायती

वाशिम २४

रिसोड ३४

मालेगाव ३०

कारंजा २८

मानोरा २२

मं. पीर २५