शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

ग्रामीण भागात आकोडे टाकून वीजचोरी

By admin | Published: January 21, 2015 1:29 AM

लोकमत स्टिंगने फोडले बिंग ;उघड्या तारांतून होत असलेल्या चोरीमुळे जनतेच्या जिवास धोका.

वाशिम: महावितरण कंपनीला अंधारात ठेवून परस्पर सर्व्हिस लाईन टाकून वीज चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्याचे लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळून आले . कारंजा तालुक्यातील इंझोरी, कामरगाव तर मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे वीज चोरीचा प्रकार सर्रास दिसून येत आहे.वाशिम जिल्हय़ात होत असलेल्या वीज चोरीबाबत लोकमत चमूच्यावतीने स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यामध्ये कित्येक ठिकाणच्या शेतशिवारात वीज चोरी करून महावितरणला लाखो रुपयांचा चुना लावल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वीज चोरीने मात्र नियमित विजेचे बिल भरणार्‍यांवर भुर्दंड बसत आहे. महावितरण कंपनीची फसवणूक करून परस्पर वीज जोडणी केल्या जाते, त्याशिवाय मीटर असतानाही त्याला बायपास करून थेट विजेचा वापर करणे, असे प्रकार नवीन नाहीत. यापूर्वी कित्येकदा वीज चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून, वीज चोरी उघडकीस आणण्यासाठी वीज वितरणकडून अनेकदा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शेकडो जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंडही कंपनीने वसूल केला आहे. वीज चोरी हा कायद्यानुसार गुन्हा ठरविण्यात आला असून, यासंदर्भात दोषी आढळणार्‍यावर कारवाई करण्याची, त्याला दंड ठोठावण्याची तरतूद आहे. वीज चोरी रोखण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. यासंदर्भात त्यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून वीज चोरी उघडकीस आणून देणार्‍यास रोख बक्षीसही देण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. ह्यवीज चोरी कळवा आणि लाखो रूपये मिळवाह्ण, असे घोषवाक्य वीज वितरणने त्यांच्या संकेत स्थळावर टाकले आहे. तथापि, त्याचा फारसा परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे. शेतशिवारात अधिकृत वीज जोडणी नसतानाही विजेच्या खांबावर थेट तार टाकून वीज चोरी करण्यात येते. या वीज चोरीमुळे महावितरणला लाखोंचा चुना लावला जातोच, शिवाय विजेचा दाब कमी होऊन रोहित्र जळण्याच्या घटनाही घडतात. याशिवाय वीज चोरी करण्याच्या प्रयत्नांत काहींनी आपले प्राणही गमावण्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. असे असले तरी, वीज चोरांवर कोणताही परिणाम होत नसून, त्यांच्याकडून वीज खांबावर तार टाकून पिकांना पाणी देण्यासाठी वीज चोरी करण्यात येत असल्याचे दिसत आहे. वीज चोरी ही शेतात पाण्याची सोय असलेल्यांकडून होण्याचे प्रकार फारसे नाहीत; परंतु जलप्रकल्प, तलाव, धरणे, बंधार्‍यांच्या जवळच असलेल्या शेतशिवारात असे प्रकार प्रामुख्याने होत असल्याचे लोकमतच्या चमूकडून करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे. वीज चोरी मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे त्याचे परिणाम नियमित ग्राहकांवर झाले आहेत. अधिकृत जोडणी घेऊन रितसर बिलभरणा करणार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वाशिम जिल्हय़ातील वीज चोरीच्या घटना पाहता २0 जानेवारी रोजीच जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेऊन वीज चोरीप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिन्यातून किमान १0 केसेस दाखल करण्याचे उद्दिष्ट्य यावेळी देण्यात आले असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.के. झळके यांनी स्पष्ट केले.