नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे जोरात सुरू आहेत. गल्लीबोळीत व रहदारी नसलेल्या रस्त्यांवरील कामांवर चक्क वीज चोरी करून नाली बांधकाम केले जात असल्याचे ह्यलोकमतह्णने १६ जून रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून स्पष्ट झाले.वाशिम शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतीने विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये रस्ते, भूमिगत गटार योजना, नाली बांधकाम, नालीवरील पुलांच्या बांधकामासह अनेक कामे जोमात सुरु आहेत. सदर कामे करताना ठेकेदारांच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून वीज वापरल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून, ह्यलोकमतह्णच्या चमूने अनेक भागात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी योजना दीप कॉलनीमध्ये नालीचे बांधकाम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या घरासमोर जाण्या-येण्याकरिता धापा टाकण्याचे काम सुरू आहे. धापा टाकण्यासाठी लावण्यात येत असलेल्या सेंट्रिंगच्या लाकूड कटाईसाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारांवर आकोडे टाकून कामे आटोपल्याचे दिसून आले. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असून, याकडे कुणाचेही लक्ष नसून, कोणीही फिरकून पाहत नाही. नाली बांधकाम होऊन जवळपास १५ दिवस झाले, तरी नागरिकांना उड्या मारुनच घरात जावे लागत आहे. संबंधित सुपरवायझरशी चर्चा केली, की आज- उद्या होऊन जाईल, असे सांगितल्या जात असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नालीचे बांधकाम करणार्यांकडे जनरेटर आहे. बर्याचदा त्याचा वापरही केला जातो; परंतु कधी छोटे-मोठे काम असल्यास तेवढय़ासाठी काय जनरेटर बोलावावे म्हणून टाळल्या जाते. अशावेळी वीज चोरी करुन काम उरकून घेतले जात असल्याचे आढळून आले. या वीज चोरीचा फटका ग्राहकांनाच बसत आहे.महावितरणच्या डोळयातही धुळफेकशहरातील फिडरवर असलेले कनिष्ठ अभियंता, अधिकारी व कर्मचारी दररोज आपल्या भागात कुठे वीज चोरी सुरु आहे का, याची पाहणी करतात. १६ जून रोजी वीज वितरण कं पनीचे अभियंता व्यवहारे परिसराची पाहणी करुन गेले होते, तेव्हा सर्व सुरळीत होते. ते गेले ना गेले काम करणार्यांनी आपला कार्यक्रम पार पाडला. यामुळे वीज वितरण कंपनीला चांगलाच फटका बसत आहे.जे कंत्राटदार वीज चोरी सारखे चुकीचे काम करीत असतील त्यांना ताकीद दिल्या जाईल व कायदेशीर काम करण्या संदर्भात सुचना केल्या जातील.- के.आर. गाडेकर, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग,वाशिम.
बांधकाम विभागाच्या कामांवर विजेची चोरी!
By admin | Published: June 18, 2017 1:56 AM