लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गोरगरीब व घरांपासून अद्याप वंचित असलेल्या लोकांसाठी शासनाकडून पंतप्रधान घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या तयार करण्यात आलेल्या यादीत अपात्र लोकांचा भरणा करण्यात आला असून पात्र लोकांना डावलण्यात आले आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामस्थांनी आमदार पाटणी यांचे लक्ष वेधून समस्या सोडविण्यासंबंधी त्यांच्याशी २६ जुलै रोजी चर्चा केली.भाजपाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री देशमुख यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी आमदार पाटणी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की तांदळी बु. या गावातील घर नसणाºया अर्जदारांना पंतप्रधान घरकुल योजनेच्या पात्र यादीतून वगळण्यात आले आहे; तर काही श्रीमतांच्या नावांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. तथापि, सदर अपात्र लोकांना यादीतून वगळून पात्र लाभार्थ्यांचा समावेश करावा, अश्ी मागणी निवेदनात करण्यात आली. दरम्यान, हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार पाटणी यांनी यावेळी संबंधितांना दिले. निवेदन देताना जयश्री देशमुख यांच्यासमवेत बबनराव देशमुख, बाळू कांबळे, वसंतराव देशमुख, अनिल देशमुख, शंकर देशमुख, सुशिला देशमुख, लिलाबाई देशमुख, रत्ना देशमुख, ज्ञानबा देशमुख, विलास देशमुख, संतोष देशमुख, नागोराव देशमुख, सुभाष देशमुख, संदीप देशमुख, माधव सुर्यवंशी, दिपक कांबळे, विकास लव्हाळे, गजानन देशमुख, विनोद लव्हाळे, गजाननराव देशमुख, सुरज देशमुख, गणेश देशमुख, नारायण सरनाईक, विमलबाई देशमुख, कैलास देशमुख, केशव देशमुख, अतिश देशमुख, मधुकर देशमुख, कल्पना जाधव, योगेश देशमुख, दिलीप देशमुख, किशोर देशमुख, सुभाष कांबळे, भगवान देशमुख आदिंची उपस्थिती होती.
तांदळी येथील पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:26 PM
वाशिम : गोरगरीब व घरांपासून अद्याप वंचित असलेल्या लोकांसाठी शासनाकडून पंतप्रधान घरकुल योजना राबविली जात आहे. मात्र, या योजनेच्या तयार करण्यात आलेल्या यादीत अपात्र लोकांचा भरणा करण्यात आला असून पात्र लोकांना डावलण्यात आले आहे.
ठळक मुद्दे या गंभीर बाबीकडे ग्रामस्थांनी आमदार पाटणी यांचे लक्ष वेधून समस्या सोडविण्यासंबंधी त्यांच्याशी २६ जुलै रोजी चर्चा केली.सदर अपात्र लोकांना यादीतून वगळून पात्र लाभार्थ्यांचा समावेश करावा, अश्ी मागणी निवेदनात करण्यात आली.