लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परजिल्हा, परराज्यातून जिल्ह्यात आलेल्या जवळपास ३० हजार नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात फिरत असल्याचे निदर्शनात येत आहे. या नागरिकांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविली. यापुढे या समितीतील सदस्यांनी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचा आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी २१ मे रोजी दिला. होम क्वारंटीन नागरिकांची चूक ही सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना भोवणार आहे.१५ मे पर्यंत कोरोनामुक्त असलेल्या वाशिम जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या एका कोरोनाबाधित रुग्णामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ झाली आहे. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्हयात परतणाऱ्या मजूर, कामगारांमुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या सर्व नागरिकांना होम क्वारंटीन करण्यात आले. तथापि, अनेकजण गावात बिनधास्त फिरत असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेत होम क्वारंटीन असलेल्या नागरिकांनी घराबाहेर निघू नये तसेच या नागरिकांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना ग्रामस्तरीय, वार्डस्तरीय समितीला जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या. ग्रामस्तरीय अथवा वार्डस्तरीय समितीच्या सदस्यांवर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीविषयी हलगर्जी अथवा दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. यामध्ये सरपंच, नगरसेवक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक इत्यादींचा समावेश असेल, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
४९१ ग्रा.पं.मध्ये समित्या कार्यरतजिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींमध्ये ग्रामस्तरीय समित्या कार्षरत आहेत. परराज्य, परजिल्ह्यातून जिल्ह्यात परतणाºया मजुरांची संख्या वाढत असल्याने या समित्यांनी आता अधिक चोखपणे कामगिरी बजावून कोरोना विषाणूपासून जिल्ह्याला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन मोडक यांनी केले.
अनेक समित्यांचे, कार्य ढेपाळलेपरराज्य, परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यात जिल्ह्यातील काही ग्रामस्तरीय समित्या, वार्डस्तरीय समित्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे. काही ठिकाणी बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करताना वेगवेगळे मापदंड लावले जात असल्याचे तसेच काही समित्या प्रभावीपणे काम करीत नसल्याचे दिसून आले.
शाळांमध्ये व्यवस्थामोठ्या संख्येने मजूर, कामगार परतत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये होम क्वारंटीनची व्यवस्था करण्यात आली. येथेही काही जण शाळेबाहेर पडत आहेत. होम क्वारंटीन व्यक्ती गावात फिरल्यास कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याने कर्मचारी दक्ष झाले आहेत.