०००००
डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीत येणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विविध वर्गांतील तज्ज्ञ डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत डॉक्टरांकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी बुधवारी केली.
00
साडेपाच कि.मी.चे कालवे झाले रद्द
वाशिम : मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी सिंचन प्रकल्पांतर्गत प्रस्तावित साडेपाच किलोमीटरचे कालवे रद्द करून उपसा पद्धतीने सिंचनाच्या प्रस्तावास शासन स्तरावरून मंजुरी देण्यात आली आहे. आता यापुढे उपसा पद्धतीने सिंचन होणार आहे.
00
प्लास्टिकबंदीचा फज्जा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, या दृष्टीने कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य दिले जात असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा उडत आहे.
00
ऑनलाइन व्यवहार जपून करा !
वाशिम : ऑनलाइन व्यवहारांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने, ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले.