शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण प्रशासनासाठी डोकेदुखी!

By admin | Published: March 10, 2017 2:11 AM

शेतक-यांच्या तक्रारी; सात महिन्यांत २५४ रस्ते मोकळे

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. ९- शेतशिवारात वहिवाटीसाठी असलेल्या पांदण रस्त्यांवर अर्थात शिवार रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा बसत आहे. यामुळे सतत होणार्‍या तक्रारींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पांदण रस्त्यांवरील अतिक्र मण काढण्यासाठी त्यामुळे प्रशासनाने मोहीम हाती घेतल्यानंतरही ऑगस्ट २0१६ ते फेब्रुवारी २0१७ पर्यंतच्या सात महिन्यांत ६३४ पैकी केवळ २५४ रस्ते मोकळे करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. शेतकर्‍यांना शेतात ये-जा करणे, मालाची ने-आण करणे यासाठी पांदण रस्ते आवश्यक आहेत. प्रत्येक शिवारात या रस्त्यांची सुविधा असली, तरी अनेक रस्त्यांवर काही व्यक्तींकडून अतिक्रमण करण्यात येते. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात पिकलेल्या शेतमालाची वाहतूक करणे कठीण होते. याबाबत शेतकर्‍यांकडून महसूल विभागाकडे तक्रारीही करण्यात येतात. अशाच तक्रारी वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर महसूल शेतशिवारातील अतिक्रमित झालेले पांदण, शेत आणि शिवार रस्ते मोकळे करण्याचा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामपातळीवर हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणचे रस्ते मोकळे झाले असले, तरी अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे कार्यवाही करणे प्रशासनाला शक्य झाले नाही. महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार वाशिम जिल्ह्यातील ९७६.२0 किलोमीटर लांबीचे पांदण रस्ते अतिक्रमित झालेले आढळून आले. या अतिक्रमणामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याने शेतशिवारातील शेतकर्‍यांना वहिवाटीसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. शासनाने रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील २५४ किलोमीटरचे १७५ रस्ते अतिक्रमण मुक्त झाले आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील ५६ किलोमीटर लांबीच्या ६३ पांदण रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यापैकी गत सात महिन्यांत २५.५२ किलोमीटर लांबीचे १८ रस्ते मोकळे करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील १८३.५0 किलोमीटरच्या १२६ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी ४.५0 किलोमीटर लांबीचे तीन रस्ते, रिसोड तालुक्यातील १९0 किलोमीटर लांबीच्या ७२ रस्त्यांपैकी ५९.00 किलोमीटर लांबीचे २७ रस्ते मोकळे करण्यात आले. मानोरा तालुक्यातील १९८.५0 किलोमीटर लांबीच्या १९३ अतिक्रमित रस्त्यांपैकी ९९ किलोमीटर लांबीचे ८९ रस्ते मोकळे करण्यात आले आणि कारंजा तालुक्यातील १६२ किलोमीटर लांबीच्या ६९ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी ६६.५0 किलोमीटर लांबीचे ६६ रस्ते मोकळे करण्यात आले. मंगरुळपीर तालुक्यात कार्यवाही शून्य!महसूल प्रशासनाच्या सर्वेक्षणानुसार मंगरुळपीर तालुक्यातील १८६.२0 किलोमीटरच्या १११ पांदण रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व रस्त्यांशी संबंधित शेतकर्‍यांना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडे अनेक शेतकर्‍यांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु ३१ जुलै २0१६ च्या सर्वेक्षणानुसार आढळलेल्या १८६.२0 किलोमीटरच्या १११ अतिक्रमित पांदण रस्त्यांपैकी मागील सात महिन्यांच्या काळात अद्याप एकही रस्त्यावरचे अतिक्रमण हटविणे शक्य झाले नाही.जिल्ह्यातील अतिक्रमित पांदण रस्त्यांवरील अतिक्रमण शक्य तितक्या लवकर हटविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. ठोस कारवाई झाल्यास पिकांचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन अतिक्रमकांनी स्वयंस्फूर्तीने केलेले अतिक्रमण हटवून प्रशासनाला सहकार्य करायला हवे. - शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम