.................
जऊळका येथे आरोग्य तपासणी
वाशिम : जऊळका येथे आणखी तीनजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आराेग्य तपासणी करण्यात आली.
.............
४१ काेटींपेक्षा अधिक थकबाकी
वाशिम : जिल्ह्यातील ६३ हजारांवर वीज ग्राहकांकडे ४१ कोटींपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्याने महावितरण आर्थिक अडचणीत सापडले आहे. ही बाब लक्षात घेता ग्राहकांनी देयके अदा करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.
.............
गतिराेधक उभारण्याची मागणी
वाशिम : वाशिम ते मंगरूळपीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहरापासून जागमाथा मंदिरापर्यंत या रस्त्याला गतिरोधक नसल्याने अपघातांची शक्यता उद्भवली आहे. गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
............
नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका
वाशिम : कोरोनाविषयक नियम तोडणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. त्या अनुषंगाने मास्क न वापरता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात येत असल्याची माहिती शहर वाहतूक निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.
..........
अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात
किन्हीराजा : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती. मात्र, वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.
..............
एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त
वाशिम : रिसोड नाका परिसरातील एटीएम अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारीदेखील असाच अनुभव नागरिकांना आला. याकडे बँकांनी लक्ष पुरविण्याची मागणी होत आहे.