लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे. याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेत गटविकास अधिकाºयांना पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आॅगस्ट महिन्यात ग्रामसभा घेण्याबाबत ग्रामपंचायतींना कळविण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. राज्य शासनाने १६ फेब्रुवारी २०१८ च्या निर्णयानुसार शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरविले आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभांचे आयोजन करून त्यांच्या क्षेत्रातील निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करावयाचे आहेत; परंतु ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या मागणीसाठी वारंवार आंदोलन, उपोषण करणाºया सत्यमेव जयते फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने १० आॅगस्ट रोजी निवेदनाद्वारे याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांचे लक्ष वेधले. आॅगस्ट महिन्यातच याबाबत ग्रामसभा घेण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना देण्याची मागणीही या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. त्यांच्या मागणीची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाºयांना ११ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. निवासी अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत आॅगस्ट महिन्यातील ग्रामसभांत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्याच्या सुचना त्यांनी या पत्राद्वारे दिल्या आहेत.
अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी ग्रामसभांबाबत उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 6:24 PM
वाशिम: निवासी प्रयोजनासाठी केलेले जानेवारी २०११ पर्यंतचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. यासाठी ग्रामपंचायतींना ग्रामसभेत निर्णय घेण्याचे अधिकारी असले तरी, ही प्रक्रिया संथ आहे.
ठळक मुद्देशासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे ठरविले आहे. अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करावयाचे आहेत.