या कार्यक्रमात भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आपले जीवन सुखमय व निरोगी बनविण्यासाठी भगवान चंद्रप्रभू व भगवान पार्श्वनाथजी यांच्या जन्म-तप कल्याण महोत्सवानिमित्त पु. आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांच्या मंगल आशीर्वादाने निर्यापक श्रमण प.पू. मुनिश्री १०८ योगसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात शिरपूर येथे ‘अंतरीक्ष पार्श्वनाथ विधान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ९ जानेवारीला अभिषेक, शांतिधारा, पात्र चयन, अंतरीक्ष पार्श्वनाथ विधान व मंगल प्रवचन आणि रविवार, १० जानेवारीला अभिषेक, शांतिधारा, विशेष रविवारीय मंगल प्रवचन कार्यक्रम संपन्न झाला. संतशिरोमणी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य निर्यापक श्रमण ज्येष्ठ मुनिश्री १०८ योगसागरजी महाराज, संघ सान्निध्यात कार्यक्रम पार पडला. सकाळी प्राचीन पवली मंदिर येथून भगवंतांची मिरवणूक निघून वाजतगाजत वस्ती मंदिरात पोहोचली. या ठिकाणी भगवंताचा अभिषेक भारतकुमार शाहा, सुशील जैन, राहुल मनाटकर, गोरे, ईश्वर मनाटकर आणि शांतिधारा सुभाष मनोहरराव विश्वंबर परिवार यांनी केला. दुपारी पूजनस्थापना, भगवान पार्श्वनाथ अभिषेक शांतिधारा उषाबाई मनाटकर व मालती भुरे यांनी केला. सिद्धिप्रदायक अंतरीक्ष पार्श्वनाथ विधानमध्ये इंद्र म्हणून सौधर्म इंद्र राहुल मनाटकर, कुबेर इंद्र राजेंद्र ढोले, ईशान इंद्र, प्रमोद कान्हेड,सनतकुमार इंद्र, सुभाष विश्वंबर, महेंद्र इंद्र, महेंद्र काळे, भरत चक्रवर्ती, योगेंद्र मनाटकर, बाहुबली देवेंद्र महाजन यांची उपस्थिती होती.
शिरपूर येथे ‘अंतरीक्ष पार्श्वनाथ विधान’ कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 5:44 AM