दक्षिण बिहार केंद्रीय विश्वविद्यालयाचे डॉ. सुमित कुमार पाठक हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्य यावर सखोल विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. एम. संचेती हाेते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजकुमार भगत यांनी केले. तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक पुरुषोत्तम वानखडे यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. डॉ. हेमंत कुमार वंजारी यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. शैलेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज कुमार मोरे, डॉ. एस. ए. पवार, प्रा. दिनेश इंगळे यांनी सहकार्य केले. आयक्यूएसी समन्वयक प्रा. डॉ. मस्के यांचे सहकार्य मिळाले.
राजस्थान महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:44 AM