मंगरुळपीर : स्थानिक चारभुजानाथ सभागृह येथे संकल्प वस्तीस्तर संघ, बिरबलनाथ चाैक मंगरुळपीरव्दारा महिला बचत गटांची वार्षिक सर्वसाधारण सभा व मार्गदर्शन शिबिराचे आयाेजन ७ जानेवारी राेजी करण्यात आले हाेते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डाॅ. गझाला खान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून धम्मपाल खंदारे, सुनील मालपाणी, भगत, इंजाळकर, गजानन राऊत, राधिका ठाकरे, कविता मालपाणी यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित हाेते. कार्यक्रमात लावण्या बचत गट, ओम साई बचत गट, अक्सा बचत गट यांनी स्वत: उत्पादित केलेले खाद्यपदार्थ व हस्तनिर्मित अनेक वस्तूंचे प्रदर्शन ठेवण्यात आले हाेते. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसह उपस्थित बचत गटातील महिलांनी मनाेगत व्यक्त केले. प्रास्ताविक रेश्मा ठाकूर यांनी तर संचालन मेघा नगरनाईक यांनी केले. आभारप्रदर्शन चंदा ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मनीषा पांडे, प्रीती अर्धापूरकर, रंजना मानेकर, ज्याेती भुतडा, साेनल दुबे, गीता बजाज, नुसरत बानाे यांनी परिश्रम घेतले.