आजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असून मानवी कृत्यामुळे नाहक निष्पाप पक्ष्यांचा बळी जात आहे. परिणामी, जागतिक चिमणी दिन साजरा करण्याची वेळ मानवावर आली आहे. या विचारातून अभ्यास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला. महाविद्यालय परिसरात आंब्याचे मोठमोठे वृक्ष असून याठिकाणी उन्हाळाभर चिमण्यांसह विविध पक्षी मोठ्या प्रमाणात अधिवास करतात. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेले साहित्य पक्ष्यांचा वावर असलेल्या जागी ठेवले तसेच वृक्षांवर बांधले. त्यांच्यासाठी पाण्याची व खाद्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशातून हा उपक्रम विद्यार्थ्यांनी राबविला. या उपक्रमात मयूरी अवताडे, प्राची ताजणे, श्रावणी राजनकर, साक्षी लबडे, गणेश मगर, शुभम पवार, विशाल पोले, प्रतीक भगत, अक्षय जाधव यासह महाविद्यालयातील प्रा. नरवाडे, प्रा. राठोड, प्रा. साळवे, प्रा. मनीषा कीर्तने, प्रा. पवार सहभागी झाले होते.
समाजशास्त्र अभ्यास मंडळाने राबविला पर्यावरणपूरक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:38 AM