लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पर्यावरणाचा समतोल कायम राखण्याच्या दृष्टिने जनजागृती म्हणून २२ सप्टेंबर हा दिवस जागतिक कारविरहित दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून पूर्वसंध्येला राष्ट्रीय हरितसेना, एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग ईको क्लबने सायकल रॅली काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. सध्या जागतिक तापमानात वाढ, इंधनाचा तुटवडा तसेच प्रदूषण नियंत्रण या समस्या जगातील सर्वच शास्त्रज्ञांपुढील प्रमुख आव्हाने ठरत आहेत. गेल्या काही दशकात वाढलेल्या प्रदूषणामुळे पृथ्वी भोवतालचा ओझोन वायुचा थर विरळ होत चालेला आहे. जागतिक प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न व्हावे, जनजागृती व्हावी या दृष्टीने राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईको क्लबच्यावतीने प्राचार्य मीना उबगडे, राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व शिक्षिका वैशाली खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात २१ सप्टेंबरला वाशिम शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदूषण टाळा, पर्यावरण जपा असा संदेश दिला.
सायकल रॅलीद्वारे पर्यावरण रक्षणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:37 PM