लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू असून ६८४१ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, त्यातील १४०० विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी १५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण अर्ज सादर करावे, असे आवाहन प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले.जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशाकरिता फेज १ आणि फेज २ पद्धतीने अर्ज स्विकारले जात आहेत. त्यानुसार, शनिवारपर्यंत ६८४१ अर्ज दाखल झाले; परंतु त्यातील १४०० अर्ज अर्धवट भरले गेले असून शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अर्ज यशस्वीरित्या ‘सबमीट’ झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच १५ डिसेंबरपर्यंत परिपूर्ण भरलेले अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
जवाहर नवोदयमधील प्रवेशाच्या १४०० अर्जांमध्ये त्रुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 2:59 PM