लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने आयोजित उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता रविवार, ३ डिसेंबर रोजी झाली.
शिरपूर जैन येथील पारसबागेत अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्यावतीने १४ आॅक्टोबर ते ३ डिसेंबर या कालावधीत उपधान तप आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दीड महिने चाललेल्या या उपधान तपामध्ये देशातील विविध राज्यातून ७ ते ७० वर्षीय तपस्वींनी सहभाग घेतला. उपधान तपामध्ये सहभागी झालेल्या तपस्वींनी सलग दिड महिना निरंतर एकासन, आयंबील, निरंकार, एक उपवास व तीन उपवास यासारखे कठीण व्रत व तप अंगिकारून सामायीक प्रतिक्रमण पुजन ही धार्मिक क्रीया पार पाडली. बलसाना तिर्थक्षेत्राचे मार्गदर्शक पंन्यास प्रवर कुलवर्धन विजयजी महाराज यांच्यासह युग प्रधान आचार्यसम पंन्यास प्रवर चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परमशिष्य पंन्यास प्रवर विमलहंस विजयजी महाराज व पंन्यास प्रवर परमहंस विजयजी महाराज यांच्या नेतृत्वात आयोजित या धार्मिक सोहळ्यामध्ये मुनीश्री हेमवर्धन विजयजी महाराज, मुनीश्री श्रमणहंस विजयजी महाराज ,मुनीश्री अर्हंमशेखर विजयजी महाराज , साध्वी समयगुणाश्रीजी, साध्वीश्री श्रृतगुणाश्रीजी, साध्वीश्री पियुषपुर्णाश्रीजी व साध्वीश्री शासनरत्नाश्रीजी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
उपधान तप आराधना महोत्सवामध्ये सहभागी तपस्वींमध्ये हेतवी सचिन पारेख, कृपा रु पेशकुमार सोनी, विधी मनिष पारख, प्रक्षाल वैभव शाह, लौकीक सचिन बोरा, आगम सागर शाह, गौतम शैलेष गेलडा, नमन पियुष कोचर, जैनम योगेश शाह, मानस परेश मेहता, निहाल विवेक दागा, सुरेंद्र सोनी, यश किशोर सोनी, यथार्थ किशोर सोनी या बालक-बालीकांसह चंद्रकांत जयंतीलाल शाह, परेश शांतीलाल अजबानी, हसमुख चंपकलाल शाह, सुरेश चंदुलाल शाह, सुरेश रसीकलाल शाह, पुष्पादेवीचंद मेहता, चंद्रीका किशोर मेहता, कल्पना सागर शाह, मिनल कुंदन हडवादीया, स्मीता राजेश मेहता, कविता जितेंद्र सोनी, शंकुतला सुरेशचंद्र शाह, मिनल मनिष पारख, चंदा हुकमचंद छाजेड, जान्हवी दिनेश मुथा, नेहा प्रेमचंद मुथा, चंचला अशोकचंद लोढा, मंगला शांतीलाल झांबड, मयुरी सुनिल बोथरा, पुष्पा डागलीया, निर्मला निर्मल संचेती, भावना दलसुखराय मेहता, आशा मानिकचंद बेदमुथा, प्रफुला मुकेश पारेख, चंदा जगदीश शाह, शंकुतला कोठारी, विजया भरत लोडाया, चंद्रीका महेश मेहता, शांता शांतीलाल छल्लाणी, लता सुराणा आदिंनी सहभाग घेतला होता.