- अरूण बळी
लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : तालुक्यातील अनेक गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांची होरपळ सुरू आहे. अशात तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावांना आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यावरून पाणीटंचाई निवारणाबाबत प्रशासन किती गंभीर आहे, ते स्पष्ट होत आहे.मालेगाव शहरासह तालुक्यात ११४ गावे असून, यातील २८ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील ग्रामस्थांच्या घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ३० ग्रामपंचायतींनी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे, तर ८ ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठ्यासाठी पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव सादर केले. त्यापैकी विहिरी, कूपनलिका अधीग्रहणाचे २५, तर टँकरचे ६ प्रस्ताव उपविभागीय स्तरावरून जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आले. त्यापैकी विहिरी, कूपनलिकेचे ११ प्रस्ताव, तर टँकरचे सहा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यामुळे संबंधित गावांतील लोकांची तहान भागणे अपेक्षीत होते; परंतु स्थिती अगदी या उलट आहे. जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांपूर्वी सहा गावांसाठी टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिल्यानंतरही आजवर एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. त्यामुळे प्रशासनाची पाणीटंचाई निवारणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच असून, ग्रामस्थांच्या घशाची कोरड मात्र कायमच आहे. खैरखेड्यात पोहोचलेले टँकर उभेच मालेगाव तालुक्यातील राजुरा, वरदरी, देवठाणा खांब, खैरखेडा आणि पिंपळवाडी या गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली खरी; परंतु एकाही गावात टँकर पोहोचले नसल्याचे वास्तव आहे. त्यातच खैरखेडा येथे सोमवार १३ मे रोजी पाणी पुरवठ्यासाठी टँकर आले खरे; परंतु या टँकरमधून गावातील विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने हे टँकर जागेवरच उभे आहे. वॉटर न्युट्रल गांगलवाडीच पाणीटंचाई मालेगाव तालुक्यातील ज्या सहा गावांत टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला. त्यात जलयुक्त शिवारची मोठ्या प्रमाणात कामे झालेल्या गांगलवाडीचा समावेश असून, सदर गाव वॉटर न्युट्रलच्या यादीत आहे. त्यामुळे या गावांत पाणीटंचाई कशी, हे पटवून देणारे पत्र जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाला सादर करण्यास सांगितले. कृषी विभागाने याबाबतचे पत्रही सादर केले आहे.
महिनाभरापूर्वी प्रस्ताव सादर केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यामुळे गावात टँकर येण्याची आम्हाला अपेक्षा होती. सोमवार १३ मे रोजी टँकर गावात आले; परंतु टँकरमधून विहिरीत पाणी सोडण्यासाठी आवश्यक साहित्यच नसल्याने चालक निघून गेला. त्यामुळे या टँकरचा फायदा झाला नाही. -आशा निवास शेळकेसरपंच, खैरखेडा गांगलवाडी येथे दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. पर्याय नसल्याने टँकरचा प्रस्ताव सादर करण्यात आला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यात त्रुटी काढण्यात आल्या. याबाबत कृषी विभागाचा प्रस्तावही सादर करण्यात आला; परंतु गावात टँकर पोहोचलेच नाही. -अन्नपूर्णा दिलिप भुरकाडेपं.स. सदस्य मालेगाव --------------------------