शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दुसरी लाट ओसरली तरी, मुलांबाबत बिनधास्त राहू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:27 AM

वाशिम : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे दुसरी लाट ...

वाशिम : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत बिनधास्त न राहता विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला.

पहिल्या लाटेत १८ तसेच दहा वर्षांआतील मुलांना फारसा कोरोना संसर्ग झाला नाही. दुसऱ्या लाटेत मात्र १८ वर्षांआतील मुलांनादेखील कोरोना संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. दुसरी लाट ओसरत असल्याने जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात असल्याने थोडी धाकधूकही कायम आहे. तिसऱ्या लाटेत १८ वर्षांआतील मुलांना अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात असून, वाशिम जिल्ह्यातही टास्क फोर्ससंदर्भात प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आहे. दरम्यान, पालकांनीदेखील अधिक सतर्क राहून मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक ठरत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी पालकांनी गाफील न राहता मुलांच्या पौष्टिक आहारावर भर द्यावा, मुलांना घराबाहेर पाठवू नये, बालकांमधील कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकारचे नियमित लसीकरण करावे, असा सल्ला बालरोग तज्ज्ञांनी दिला.

०००

अशी घ्यावी बालकांची काळजी !

वयाच्या दहा वर्षांपर्यंत बालकांचे विविध प्रकारे लसीकरण केले जाते. तिसरी लाट येण्यापूर्वी बालकांना आवश्यक असलेल्या लसी वेळेतच देण्यात याव्या. बालकांना संतुलित, प्रोटीनयुक्त, पौष्टिक आहार द्यावा, नियमित देत असलेले अन्न हेच उत्तम आहे. बाहेरचे अन्न देणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी मुलांना नेणे टाळावे. पालकांनी आपण स्वत: बाधित होणार नाही याची काळजी घ्यावी. फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक्स, पावसात भिजणे याबाबींपासून लहान मुलांना दूर ठेवावे.

०००००

बालकांची विशेष काळजी घेण्याचा बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

कोट बॉक्स

तिसरी लाट येऊच नये, अशी आशा करूया. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता बालकांना फ्लूची लस देणे हा उपाय आहे. दुखणे अंगावर काढू नये. तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बालकाला ताप असल्यास रक्ताच्या विविध चाचण्या कराव्यात.

- डॉ. हरिष बाहेती

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

.........

बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहारावर भर द्यावा. नियमित लसीकरण करावे. आपल्यापासून बालकांना कोरोना संसर्ग होणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यावी. मास्कचा वापर, हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचे पालन करावे.

- डॉ. विजय कानडे

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

.......

सध्यातरी १८ वर्षांखालील बालकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. त्यामुळे बालकांच्या आरोग्याची सुरक्षा म्हणून इन्फ्यूएन्झा लस अवश्य द्यावी. बालकांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे. ताप, सर्दी व अन्य लक्षणे दिसून येताच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- डॉ.राम बाजड

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

.......

सर्दी, ताप, खोकला, उलटी, पातळ शौचास ही लक्षणे बालकांमध्ये दिसून येताच वेळ न दडविता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. घराबाहेर पडताना बालकांना नेहमी मास्क लावावे. घरातील वयस्क नागरिकांपासून बालकांना दूर ठेवावे.

- डॉ. प्रवीण वानखडे

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

........

बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित, प्रोटीनयुक्त, पौष्टिक आहार वाढवावा. पावसाळ्याच्या दिवसात शक्यतोवर बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.

- डॉ. किरण बगाडे

बालरोगतज्ज्ञ, वाशिम

०००००