याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार धामणी (मानोरा) येथील अकृषक शेती ५१/०१ मधील श्रीकृष्ण पुरुषोत्तम मुद्दलकर, बबन पुरुषोत्तम मुद्दलकर, मृत दमडाजी सोनबाजी मोरकर यांच्या मालकीचे प्लाॅट बनावट आधारकार्डचा वापर करून प्लाॅट क्रमांक १६ व २२ अनुसया गजानन चव्हाण यांना विक्री केला, तर प्लाॅट २५ व ३३ विजय किसन राठोड यांना विक्री करून तशी नोंदसुद्धा घेण्यात आली.
प्लाॅट खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनुसया चव्हाण व विजय राठोड यांनी मानोरा पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दाखल केली. दुय्यम निबंधक नितीन रामचंद्र सोनवणे यांनी मानोरा पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी शुभम सुनील तायडे, देवराव तुकाराम तांबारे, किशोर हरिभाऊ गावंडे व मधुकर देवबाजी बडवे या चार इसमांवर भादंविचे कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल करून मानोरा पोलिसांनी प्रकरण तपासात घेतले आहे. ठाणेदार शिशिर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत असून घटनेच्या दिवसापासून यातील मास्टर माईंड आरोपी फरार आहेत.