वाशिम : जून महिन्यातील २८ दिवसांत एकूण ३२०६ जणांनी कोरोनावर मात केली, तर १,३२५ जणांना संसर्ग झाला. दरदिवशी सरासरी ११४ जण बरे झाले असून, दरदिवशी सरासरी ४७ रुग्ण आढळले.
जिल्ह्यात गतवर्षी ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) या ग्रामीण भागातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७,१४३ होते. यापैकी ६,८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारांवर रुग्ण आढळून आले असून, यापैकी ३०,४९० जणांनी कोरोनावर मात केली, तर ४२४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत असून, जून महिन्यात तर रुग्णसंख्याही दोन अंकी येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. १ ते २८ जून २०२१ या कालावधीत एकूण १,३२५ जणांना कोरोना संसर्ग झाला, तर ३,२०६ जणांनी कोरोनावर मात केली. या २८ दिवसात एकूण ४० जणांचा मृत्यू झाला.
००००
बॉक्स
अशी आहे कोरोनाविषयक आकडेवारी
३१ मेपर्यंत २८ जूनपर्यंत
एकूण ४०,०६३ ४१,३८८
डिस्चार्ज ३७,३२६ ४०,५३२
मृत्यू ५७८ ६१८
०००
१ ते २८ जूनदरम्यानचा लेखाजोखा
एकूण रुग्ण १,३२५
बरे झाले ३,२०६
एकूण मृत्यू ४०
००००००
बॉक्स
मात करणाऱ्यांची संख्या दुप्पट !
जून महिन्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. २८ दिवसात १,३२५ रुग्ण आढळून आले, तर दुपटीपेक्षा अधिक अर्थात ३,२०६ जणांनी कोरोनावर मात केली. दिवसाला सरासरी ११४ जण कोरोनातून बरे झाले.
००००००००००००००००