कोरोनाचा सर्वत्र वाढता प्रादुर्भाव बगता शासनाने कोविड-१९ ची लस उपलब्ध करुन दिली आहे. सद्यस्थितीत ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीसाठी मोफत शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहे्न, तसेच आरोग्य कर्मचारी व प्रत्येक शासकीय . कर्मचाºयांना ही लस विनामूल्य उपलब्ध आहे. तरी सुध्दा लोकांमधे जे लस विषयी गैरसमज आहेत. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात लसीकरण होत नाही आहे. त्यावर उपाय योजना म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र धनज बु. येथे नियोजन बैठक ठेवण्यात आली. यावेळी तहसीलदार धीरज मांजरे व गट विकास अधिकारी कालिदास तापी साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण जाधव, विस्तार अधिकारी पंचायत सा. हि. चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. सागर म्हस्के, वैभव कौलखेडे यांची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदारांनी मार्गदर्शन करताना जनतेला लसीकरणाविषयी माहिती दिली .शासनाने आपल्या सुरक्षतेसाठी ही लस आपल्या पर्यंत मोफत मिळवून दिली आहे कोरोनाला जर संपवायचं असेल तर सवार्नी स्वत:हुन लसिकरण बूथ वर येऊन लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले व तिथेच त्यावेळी धनज बु. येथील तंटा मुक्ति चे अध्यक्ष हसनभाई व सरपंच परवीन जिकर मोटलानी यानी स्वत: लस घेऊन सर्व धनजवासियांना आम्ही लस घेतली आम्ही अगदी सुरक्षित आहोत तुम्ही पण लस घ्या आणि तुम्ही पण सुरक्षित व्हा, असे आवाहन केले. यावेळी धनज बु. येथील सरपंच, ग्रामसेवक, पटवारी, पोलिस पाटील , शिक्षक वृंद, कोतवाल , सर्व धर्म, आपातकालीन मित्र मंडळचे, श्यामभाऊ सवाई, रोशन शेंदुरसे आदि गावकरी मंडळी उपस्थिति होती.
गावातील ४५ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने करोना लस घेणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:42 AM