लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्या या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.येथील आदिवासी भवनात ४ फेब्रुवारी दुपारी १ वाजता संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिप-बमसंचे तालुकाअध्यक्ष महादेव भगत होते. प्रमुख अतिथी म्हणुन भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष हाजी युसुफ पुंजाणी, सामाजिक कार्यकर्ते हंसराज शेंडे, विजय मनवर, डॉ.नरेश इंगळे , प्रा.जय चव्हाण, बि.डी.मनवर, नगरसेवक फैजल नागाणी, मराठा सेवा संघाचे राजेंद्र ठाकरे, माणिक डेरे, जुम्माभाई भगतवाले, दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर, युनुस खान आदिंची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात प्रा.मुकूंद खैरे यांनी संविधानातील काही महत्वांच्या बाबींची माहिती दिली.यानंतर प्रा.जय चव्हाण, डॉ.नरेश इंगळे, राजेंद्र ठाकरे, विजय मनवर, दत्तात्रय रामटेके, चंद्रकांत जांभरुणकर यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. संविधानाचे अभ्यासक हंसराज शेंडे आपल्या भाषणात म्हणाले की, संविधानाने देशातील प्रत्येक जाती ,धर्माच्या माणसाला अधिकार दिले. मतदानाचा अधिकार सर्वांना दिला त्यामुळे सामान्य माणुस राजकारणात मोठा झाला. संविधानामुळे आपणाला हक्क कळले. २६ जानेवारी रोजी प्रशासनाने संविधानाबद्दल जाणिव जागृती करुन कार्यक्रम राबविले पाहिजे, त्यासाठी आपण आग्रह धरणार असेही ते म्हणाले. युसुफ पुंजाणी यांनी संविधानाची महती सांगुन संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणार्या बाळासाहेब अांबेडकरांसोबत बहूजन समाजाने राहवे. ८५ टक्के बहूजन एकत्र आले तर संविधानाला विरोध करणार्या जातीयवादी शक्तींचा नायनाट होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ केवळ संविधानामुळेच आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण महादेव भगत यांनी केले. संचालन गोपाल शर्मा यांनी केले. डॉ.सुरेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला संविधान प्रेमी नागरिकांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी भारिप बमसं, समाजाक्रांती आघाडी, भिमशक्ती सामाजिक संघटना, भगवान बिरसा मुंडा, संघटना व दिव्यांग आधार संघटनांच्या पदाधिकार्यांनी योगदान दिले.
संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असावे - प्रा. मुकूंद खैरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:21 AM
मानोरा : जगात सर्वश्रेष्ठ आणि मजबुत असे संविधान डॉ.बाबासाहेब आांबेडकरांनी दिले. समता,बंधुता, न्याय,मानवता, धर्मनिरपेक्षता, गणराज्य अशी अनेक तत्वे या संविधानात आहे. देशातील प्रत्येक घटकातील नागरिकांना हक्क देणार्या या संविधानाप्रती प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे असे प्रतिपादन राज्य घटनेचे अभ्यासक तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मुकूंद खेरे यांनी केले.
ठळक मुद्देसंविधान सन्मान परिषद