प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष शैलजा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन व वाहतूक नियम याविषयी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय शिंदे होते.
ॲड. उंडाळ यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय युवा दिनाची पार्श्वभूमी विशद केली. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एन.पी. मोहोड यांनी वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य आहे, असे मत व्यक्त केले.
जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष ॲड. छायाताई मवाळ यांनी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय युवा दिन तसेच वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करतांना युवकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव शिंदे म्हणाले, आजचा युवक उद्याचे भविष्य आहे. युवकांकडून मोठ्या अपेक्षा असून त्यांनी आत्मनिर्भरता, महत्वाकांक्षा जोपासून काम केले पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ॲड. गीतांजली गवळी यांनी केले. यावेळी जिल्हा विधिज्ञ संघाचे पदाधिकारी, सदस्य, न्यायिक कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.