लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे. पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमधील ४००० हजार पेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला होता. या गावांतील लाखो ग्रामस्थांनी ४५ दिवस जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करून कोट्यवधी लिटर पाणी साठविण्याची क्षमता निर्माण केली. या सर्व वॉटर हिरोजना मानवंदना देण्यासाठी आणि स्पर्धेच्या विजेत्यांचा सन्मान करण्यासाठी पाणी फाऊंडेशनने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान यांच्यासह कला, राजकारण व उद्योग क्षेत्रातील मातब्बर मंडळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान, यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती. या दोन्ही तालुक्यांतील ५५ गावांनी स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन श्रमदानाच्या माध्यमातून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावाला स्पर्धेचा विजेता म्हणून घोषीत केले जाणार आहे. त्यामुळे मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांतून कोणाला तालुकास्तरीय पुरस्कार मिळतो किंवा स्पर्धेचा विजेता, उपविजेता म्हणून एखाद्या गावाची निवड होते काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संबंधित मंडळींना आमंत्रित करण्यात आले आहे.
वॉटर कप स्पर्धेच्या पुरस्काराबाबत उत्सूकता; वाशिम जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:40 PM
वाशिम: वॉटर कप स्पर्धा २०१८ चा पुरस्कार वितरण सोहळा १२ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, वाशिम जिल्ह्यातून स्पर्धेत सहभागी झालेल्या ५५ गावांना या सोहळ्याची उत्सूकता लागली आहे.
ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रातल्या ७५ तालुक्यांमधील ४००० हजार पेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला होता. यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्याची निवड झाली होती.वॉटर कप स्पर्धेत तालुक्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाºया गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.