कार्यक्रमात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक व पूजन करण्यात आले. ध्वजारोहण व जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. दुपारी शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. दरम्यान ऑनलाइन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्सव समितीचे समन्वयक मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे यांनी केले. याप्रसंगी मोरया ब्लड डोनर ग्रुपकडून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात साठ शिवभक्तांनी रक्तदान करून रक्तगट तपासणी केली. यासाठी महेश धोंगडे यांनी पुढाकार घेतला. मीनाक्षी नागराळे, वृषाली टेकाळे, प्रवीण पट्टेबहादूर यांनी स्पर्धांचे संयोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.योगेश्वर निकस, उत्सव समिती अध्यक्ष नामदेवराव हजारे, सचिव सागर गोरे, हुकूम तुर्के, प्रल्हाद ढंगारे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ, विजयराव शिंदे, मदनराव बोरकर, माधव वानखेडे, संजय बाजड, जिजाऊ ब्रिगेडच्या संजीवनी बाजड, सुरेखा आरु, सुरेखा निकस, मीनाक्षी शिंदे, अनिता कोरडे, शोभा ढंगारे, वैशाली बुंधे, नामदेवराव हजारे, सागर गोरे, गजानन तुर्के, आकाश भोयर, योगेश लोनसुने, दिव्या देशमुख आदींनी परिश्रम घेतले.
वाशिम येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:57 AM