लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, ३० सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर साडेआठ वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व पंचशिल त्रिशरण ग्रहण करण्यात आले. सकाळी ९ वाजता शहरातून धम्मरथ रॅली काढण्यात आली. रात्री ८ वाजता ‘वर्तमान भारतातील सामाजिक समस्येवर धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आणि उपाय’ या विषयावर जाहीर व्याख्यान झाले. तसेच स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महामानवाच्या पुतळ्याजवळ सकाळी ७ वाजताच्या सुमारास बौद्ध बांधव व आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत महामानवाला अभिवादन केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 7:23 PM
वाशिम - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ३० सप्टेंबर रोजी वाशिम शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम पार पडले. स्थानिक नालंदानगर येथे शनिवार, ३० सप्टेंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ८ वाजता भंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर साडेआठ वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व पंचशिल त्रिशरण ग्रहण करण्यात आले.
ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहातभंते प्रज्ञापाल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व शहरातून धम्मरथ रॅली काढण्यात आली