कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राज चौधरी होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यपालन अधिकारी संजय जोल्हे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सुधीर खुजे, महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक, तालुका अभियान व्यवस्थापक आरती अघम, उपसरपंच रघुनाथ भगत, प्रगती ग्रामसंघ अध्यक्षा सुलभा लांडे, माॅ. दुर्गा ग्रामसंघ अध्यक्षा कांचन श्रीराव, माॅ. जिजाऊ ग्रामसंघ अध्यक्षा निर्मला इंगोले यांच्यासह ग्रा. पं. सदस्यांसह इतर मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. या प्रदर्शनात ४० महिला समूह स्वयंसहाय्यता गटांच्या वतीने विविध खाद्य पदार्थांसह इतर साहित्याचे स्टाॅल लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचलन तथा आभार प्रदर्शन प्रभाग समन्वयक भूषण वानखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुलभाताई शिंदे, वनमाला गिरी, वृंदाताई शिंदे, दुर्गाताई बावने, शारदा करडे, नीलिमा मुळे, रंजना कराळे, अर्चना इंगोले, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:44 AM