महागाव येथील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढला. हे पीक हातातोडाशी आले असतानाच परतीच्या पावसामुळे या पिकाला फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाहून गेले. तसेच अनेकांच्या शेतातील सोयाबीन पिकाला कोंब फुटले. यामुळे हताश झालेल्या पीकविमाधारक शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अर्ज केले. त्यानंतर पीकविमा कंपनीक्या प्रतिनिधींनी नुकसानाची पाहणी करून अहवाल कंपनीकडे पाठविला. तथापि, चार महिने उलटले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याचा लाभ मिळाला नाही. याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
-----------
कोट: आम्ही चार एकर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा विमा काढला होता. परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे या पिकाचे नुकसान झाल्याने केलेला खर्चही वसूल होऊ शकला नाही. या नुकसानाची पाहणीही विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी केली, परंतु अद्याप आम्हाला विम्याचा लाभ मिळाला नाही.
-गजानन जमधाडे, नुकसानग्रस्त शेतकरी, महागाव