लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील ग्राम साळंबी येथे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्य सुमारास वीज पडून १६ जनावरे ठार झाल्याची घटना घडली. साळंबी येथे गावतलावात गावातील जनावरे पाणी पिण्याकरिता गेले असता सायंकाळच्या सुमारास जनावरांच्या अंगावर वीज पडल्याने १६ जनावरे जागीच ठार झाली. त्यामध्ये गाई व बैलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मंडळ अधिकारी सुनिल खाडे, तलाठी इंगोले यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पंचनामा करुन पशुसंवर्धन अधिकाºयांना जागेवरच जनावरांची उत्तरीय तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदार वाहुरवाघ यांनी दिल्या. घटनास्थळी गावकºयांनी एकच गर्दी केली होती. महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत पशुपालक रामपाल रामचंद्र चव्हाण, खेमचंद रामचंद्र चव्हाण, विजय फुलसिग चव्हाण, हरदास कालु चव्हाण, बालुसिग रामु राठोड, मोतीराम निवृत्ती खडसे, बंडु धेमा राठोड, मधुकर धेमा राठोड, नामदेव झामस्ािंग राठोड, गौपीचंद बालु पवार, रोहीदास दामु राठोड, विठ्ठल जेमसिंग चव्हाण या पशुपालकांची जनावरे दगावली आहेत.
तामसाळा येथे वीज पडून दोन जण जखमीवाशिम तालुक्यातील तामसाळा येथे शेतात वीज पडल्याने २ जण जखमी झाल्याची घटना ११ आॅक्टोंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रेमप्रसाद रामप्रसाद सिंगरोल (३५) व श्यामप्रसाद रामप्रसाद सिंगरोल (४२) अशी जखमींची नावे आहेत. शेतात काम करीत असताना दुपारच्या सुमारास वीज पडल्याने उपरोक्त दोन जण जखमी झाल्याची माहिती वाशिम तहसील प्रशासनाने सायंकाळी दिली.