लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दक्षिण-मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांत महिनाभरासाठी तात्पुरत्या स्वरूपात डब्बे वाढवून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध केली आहे. यात प्रवाशांच्या मागणीनुसार हुजूर साहिब नांदेड-ंगंगानगर-हुजूर साहिब नांदेड या त्रि-साप्ताहिक रेल्वे गाडीचाही समावेश असून, या गाडीच्या डब्ब्यांची संख्या वाढविताना त्यात एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्बा जोडला आहे. त्यामुळे या रेल्वेगाडीतील वातानुकूलित डब्यांची संख्या ५ झाली आहे. त्याचा फायदा अकोला, वाशिम जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना होणार आहे.उन्हाळ्यांच्या दिवसांत सुट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक मंडळी परिवारासह थंडहवेचे ठिकाण, धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतात. त्याशिवाय लग्नसोहळ्याचीही धामधूम असते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येते लक्षणीय वाढ होते. प्रामुख्याने रेल्वे प्रवासावर अनेक जण भर देतात. अशात रेल्वे गाड्यांत गर्दी होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे अनेक प्रवाशांनी नांदेड-ंगंगानगर या एक्स्पे्रस गाडीत अतिरिक्त वातानुकूलित डब्बा जोडण्याची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेऊन दक्षिण-मध्ये रेल्वेने नांदेड-गंगानगर या रेल्वे गाडीच्या डब्यांची संख्या वाढवून १९ केली आहे. त्यासाठी एक अतिरिक्त तृतीय श्रेणी वातानुकूलित डबा जोडण्यात आला असून, आता या रेल्वेगाडीतील वातानुकूलित डब्यांची संख्या ५ झाली आहे. पश्चिम वºहाडातील अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना त्याचा लाभ होणार आहे.
नांदेड-गंगानगर रेल्वे गाडीला अतिरिक्त वातानुकूलित डबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 5:35 PM