शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

लोकसहभागातून २.४९ कोटी लीटर पाणी साठवण्याची सोय                    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 2:32 PM

जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क                           वाशिम : गावाच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या हद्दपार करण्याचा जणू वाशिम जिल्ह्यातील साखरावासियांनी विडाच उचलला आहे. जलसंधारणाची विविध कामे केल्यानंतर आता साखरावासियांनी गावातील तलावाचे लोकसहभागातून खोलीकरण केले आहे. यामुळे तब्बल २.४९ कोटी लिटर पाण्याची साठवणूक होणार आहे. शेतकरी, ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून ही किमया साधली आहे.आदर्श गाव साखरा येथील जलमित्र तथा ग्रामकार्यकर्ते सुखदेव आत्माराम इंगळे यांनी जलमित्र या नात्याने गावात जलजागृती व जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचे फलित झाले आणि गावातील बुजत चाललेल्या तलावाचे पुनरुज्जीवन झाले. १० जेसीबी मशीनच्या आधारे या तलावातील गाळाचा उपसा करण्यात आला आणि हा गाळ शेतकºयांनी आपल्या शेतात टाकून आपली हलकी जमीन सुपिक बनवली आहे. शेतकरी, ग्रामस्थांच्या श्रमदानासह लोकवर्गणीतून या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यानंतर तलावाची लांबी २६० मीटर, रुंदी १२० मीटर आणि खोली ८० मीटर झाली आहे. त्यामुळे या तलावाची पाणी साठवण क्षमता २ कोटी ४९ लाख ६० हजार लीटर झाली आहे.  यामुळे गावातील भुजल पातळीतही वाढ होणार असुन, त्याचा फायदा शेती सिंचनासह गुरा ढोरांना होईल आणि भविष्यात पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही.  ८८२० ब्रास गाळ उपसासाखरा येथे लोक सहभागातून करण्यात आलेले तलाव खोलीकरण जिल्हाभरातील लोकांसाठी आदर्श ठरावे, असेच आहे. या तलावासाठी अवघ्या ७ जेसीबी मशीनच्या आधारे १० दिवसांत तब्बल ८८२० ब्रास खोदकाम करून गाळाचा उपसा करण्यात आला. तर १९ शेतकºयांनी तब्बल ८६९० ट्रॉली गाळ नेऊन आपल्या शेतात टाकला आहे. त्यात गजानन राऊत आणि महादेव राऊत यांनी प्रत्येकी २००० ट्रॉली, भास्कर महाले यांनी ७०२ ट्रॉली, गजानन इंगळे यांनी ५५० ट्रॉली, राजाराम वैद्य यांनी ५०२, विजय अघम यांनी ३९०, मधुकर शिंदें यांनी ३६०, रामराव इंगळे, लक्ष्मण राऊत, भास्कर ठाकरे, सखाराम राऊत यांनी प्रत्येकी ३५०, मारोती इंगळे, रामचंद्र इंगळे यांनी प्रत्येकी १६०, महादेव महाले १५५, पंढरी महाले १५०, तर बंडू धतुडे, शिवाजी शिंदे, श्रीराम महाले यांनी प्रत्येकी १०० ट्रॉली गाळ शेतात नेऊन टाकला आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी