गत दाेन महिन्यांपूर्वी काेराेना संसर्ग माेठया प्रमाणात असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढली हाेती. यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडाही जाणवला हाेता. यावेळी या सिलिंडरच्या भावातही वाढ झाल्याचे दिसून आले हाेते. परंतु गत दाेन महिन्यांपूर्वीचे दर व आजचे दर पाहता यामध्ये घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात ऑक्सिजन सिलिंडर विक्रेत्यांशी संपर्क साधला असता काेराेना संसर्ग कमी झाल्याने ऑक्सिजनचीही मागणी घटली आहे. यामुळे दर कमी झाले असल्याचे सांगण्यात आले.
ऑक्सिजन सिलिंडरचे दर कमी झाल्यानंतरही जिल्हयातील अनेक हाॅस्पिटलमध्ये मात्र रुग्णांना आकारण्यात आलेले दर जैसे थे दिसून येत आहेत. आधिच त्रस्त असलेल्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-------------
हाॅस्पिटलचे दर मात्र कायमच
काेराेना संसर्ग झालेला रुग्ण हाॅस्पिटलमध्ये भरती असल्यास त्याला मात्र प्रतिदिन खर्च जैसे थेच दिसून येत आहे. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णास अनेक हाॅस्पिटलमध्ये १ हजार रुपयांपासून प्रतिदिन बिल आकारले जात आहे. एखादा रुग्ण ५ दिवस भरती असल्यास १ हजार रुपयाप्रमाणे त्यास ५ हजार रुपये ऑक्सिजनसाठी माेजावे लागत आहेत. सर्वसामान्य रुग्णास हे परवडण्यासारखे नसल्याची ओरड हाेत आहे.
--------------
काेराेना संसर्ग पाहता, दाेन महिन्यांपूर्वी ऑक्सिजन सिलिंडरचे दर माेठया प्रमाणात वाढले हाेते. परंतु सदयस्थितीत यामध्ये घसरण आली आहे. काेराेना संसर्गाच्या घटत्या प्रमाणामुळे व ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या घटत असल्याने ही घसरण झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझे इंदौरला कार्यालय असून, वाशिम येथे शाखा आहे. वाशिम शाखेतून अनेक हाॅस्पिटलला ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करताे आहे.
- गजानन मानमाेठे, ऑक्सिजन सिलिंडर विक्रेते
--------------
असे आहेत ऑक्सिजन सिलिंडरचे दर
सिलिंडर दाेन महिन्यांपूर्वीचे दर आताचे दर
५ लिटर १० हजार रुपये ७ हजार रुपये
७ लिटर १२ हजार रुपये ९ हजार रुपये
१० लिटर १५ हजार रुपये १० हजार रुपये
२५ लिटर ५० हजार रुपये २५ हजार रुपये
-------