शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाशिम जिल्ह्यात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 11:28 AM

एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : साधारणत: मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असून, एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील कुटुंबकल्याण तसेच नेत्रशस्त्रक्रिया प्रभावित झाल्या आहेत. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही.कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सरकारी आरोग्य यंत्रणा कोरोनाबाधित आणि संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने, कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे दिसून येते. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असून, हा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र शासनाने २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू केले. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. जून, जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली. सरकारी आरोग्य यंत्रणा ही कोरोनाबाधित तसेच संदिग्ध रुग्णांच्या उपचारार्थ तैनात असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयांमधील कुटुंबकल्याण, नेत्रशस्त्रक्रिया व अन्य शस्त्रक्रिया प्रभावित होत असल्याचे समोर येत आहे. ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल ते ४ आॅगस्ट २०२० या दरम्यान एकही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया झाली नाही. नेत्रशस्त्रक्रियाही प्रभावित झाल्या आहेत. परिणामी, गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात नेत्रशस्त्रक्रिया तसेच कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊन ठेपल्याने आर्थिक भूर्दंड बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असल्याने याचा परिणाम अन्य शस्त्रक्रियांवर होत आहे.

लवकरच शस्त्रक्रिया विभाग सुरू करू !कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयासह कोविड केअर सेंटर येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकामी आरोग्य यंत्रणा गुंतली आहे.४कोरोनाच्या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया प्रभावित झाल्या. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया तसेच नेत्रशस्त्रक्रिया लवकरच सुरू केल्या जातील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल