मंगरुळपीर- वाशिम जिल्हयासह परजिल्हयात मंगरुळपीर येथील सुकामेवायुक्त दुध प्रसिध्दीस येत आहे. रात्रीच्या वेळी येथे दूध पिणाऱ्यांची एकच गर्दी होत असून ग्राहकांना प्रतिक्षा करावी लागत आहे.
मंगरुळपीर येथे अनेक उपहारगृहे संध्याकाळपासूनच सुकामेवायुक्त दुधाची विक्री करताना दिसतात. आरोग्याकरिता पौष्टीक समजले जाणारे हे दुध शहरातील काही प्रमुख ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी दिसून येते. मंगरुळपीर शहरात अकोला चौक परिसरात काही उपहारगृहे सुकामेवायुक्त गरम दुध अनेक वर्षांपासून विक्री करतात.
सतत आटवुन घट्ट करण्यात येत असलेले हे दुध आरोग्यास पौष्टीक व केवळ १० रुपयात ग्लासभर मिळत असल्याने येथे मोठया प्रमाणात गर्दी होतांना दिसून येत आहे. अकोला चौकातील तीन ते चार उपहार गृह रात्री उशिरापर्यंत हे दुध तापवित असतांना या परिसरात सर्वत्र केसरयुक्त दुधाचा सुगंध दरवळलेला असतो. मंगरुळपीर शहरातील या दुधाची चर्चा आता इतर जिल्ह्यातही पसरली असून या रस्त्यावरुन धावणाºया बसेस, वाहने थांबून या दुधाचा आस्वाद घेतांना दिसून येत आहेत.
<